मुंबई- आझाद मैदानात गेल्या 14 दिवसांपासून राज्यातील शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. याकडे राज्यसरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनकर्त्यांनी आज टोकाची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आत्मदहन करू, असा इशारा आंदोलनातील शिक्षकांनी केला आहे. त्यासाठी 1 हजार 146 शिक्षक कर्मचारी 4.30 वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानाच्या दिशेने आगेकूच करणार आहेत.
शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा
14 दिवसांपासून राज्यातील शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. याकडे राज्यसरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनकर्त्यांनी आज टोकाची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आत्मदहन करू, असा इशारा आंदोलनातील शिक्षकांनी केला आहे. त्यासाठी 1 हजार 146 शिक्षक कर्मचारी 4.30 वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानाच्या दिशेने आगेकूच करणार आहेत.
काय आहे मागणी -
गेल्या 20 वर्षांपासून होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड थांबविण्यासाठी 13 सप्टेंबर 2019 नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांचा 20 टक्के व टप्पा वाढ शाळांचा 40 टक्केचा निधी वितरणाचा आदेश सभागृहात वारंवार आश्वासित केला आहे. तरी सुध्दा याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मागील वर्षात 24 मार्च 2020 ला अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी पुरवणी मंजूर केली, त्यानंतर कोरोनामुळे निधी वितरण करण्यात आलेला नाही.
शासनाचा वेळकाढूपणा -
गेल्या पंधरा दिवसांपासून विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आपल्या मागण्यांकरिता बेमुदत धरणे आणि आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
अनेकदा राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळ यांना बोलविण्यात आले होते. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर शासनाने आणखी पंधरा दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे शासनाचा हा वेळ काढुपणा असल्याने शिक्षकांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
TAGGED:
Teachers agitation Mumbai