मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. राज्यभर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तरही काही ठिकाणी सरकारच्या आदेशाचे पालन होत नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खडसावलं आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतलं, परंतु, हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना: आता सरकारला संयम ठेवणं शक्य नाही, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावलं आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतलं, परंतु, हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या निर्णयाचं, निर्बंधांचं पालन बहुतांश जनता करत आहे. परंतु,रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या लोकांमुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे अजित पवार म्हणाले. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु असे अजित पवार म्हणाले.
राज्याचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत आहेत. या सर्वांची मेहनत राज्यशासन वाया जावू देणार नाही. त्यासाठी, निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.