मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीदरम्यान प्रचारात रंग आणला आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'ये लाव रे तो व्हिडीओ' या वाक्याने. त्यानंतर हे वाक्य टी शर्टवर छापून मनसेसैनिक राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत.
'ये लाव रे तो व्हिडीओ'च्या टी शर्टने लक्ष घेतले वेधून
हा प्रचार करताना राज ठाकरे यांनी मोदी, शाह यांचे जुने व्हिडिओ दाखवून त्यांना उघडे पाडायला सुरुवात केली.
देशात सात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात उतरले आहेत. मात्र, यात मनसे हा राजकीय पक्ष कुठलाही उमेदवार नसताना प्रचार करत आहे. महाराष्ट्रभर सभा घेताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपविरोधात प्रचार करत आहेत.
हा प्रचार करताना राज ठाकरे यांनी मोदी, शाह यांचे जुने व्हिडिओ दाखवून त्यांना उघडे पाडायला सुरुवात केली. हे व्हिडिओ दाखवताना राज ठाकरे यांचे 'ये लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य खूपच प्रसिद्ध झाले. हे वाक्य लिहिलेले टी शर्ट घालून मनसेचे संदीप देशपांडे आणि मनसैनिक सभेच्या ठिकाणी लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.