मुंबई- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आंदोलनकर्त्यांची आज सायंकाळी साडेचार वाजता मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.
सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर मराठा आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयात बैठक
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सात दिवसापासून आंदोलन सुरू आहे. येथील आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट घेतली.
सुप्रिया सुळे
हेही वाचा-अबब...फडणवीस सरकारचा जाहिरातींवरचा खर्च जाणून व्हाल थक्क!
या भेटीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी विविध मागण्यांवर आंदोलकांनी चर्चा केली. शिवाय आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजीराव जोंधळे आणि दोन्ही पक्षांचे वकील व आंदोलनातील सहभागी चार समन्वयक बैठकीत सहभागी होणार आहेत. अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.