मुंबई -मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर आता खा. सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले. याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असे त्या म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात आणकी काही ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणतात की, परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.
मला आवर्जून सांगणे की, जर असेच बोलले असेल, तर त्यांनी महिला सन्मान जपला म्हणून आपण आहोत म्हणून आपण सुसंस्कृत म्हणता असलं तरी आपण या प्रवृत्तीच्या शब्द टाकूया आणि महाराष्ट्राची परंपरा आहे, ती जतन करूया. या सर्वच भिन्नता विविध स्थानी, जाणकारांनी समंजसची भूमिका मांडून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृत महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. असे सांगून त्यांना धन्यवाद दिले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या अशोभनीय वक्तव्यानंतर सोमवारी सत्तार यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर दगडफेकही केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकांमुळे आता शिंदे गटाच्या नेत्यांना मनस्ताप होत असल्याचे दिसत आहे. सत्तार यांच्या वक्तव्यावरून आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची कान उघडणी केली असून, केसरकर यांनी सत्तारांना घरचा आहेर दिला आहे.