महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कठोर संघर्षानंतर निर्भयाला न्याय, दुसरी निर्भया होऊ नये याची खबरदारी घेऊ

सात साडेसात वर्षाच्या कठोर संघर्षानंतर अखेर निर्भयाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. निर्भयाची आई ज्या प्रसंगातून, दुःखातून गेली असेल, त्याबद्दल मी निशब्द असल्याचेही सुळे म्हणाल्या.

Supriya sule comment on nirbhaya case
कठोर संघर्षानंतर निर्भयाला न्याय,

By

Published : Mar 20, 2020, 12:00 PM IST

मुंबई -सात साडेसात वर्षाच्या कठोर संघर्षानंतर अखेर निर्भयाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. निर्भयाची आई ज्या प्रसंगातून, दुःखातून गेली असेल, त्याबद्दल मी निशब्द आहे. पण आता पुन्हा दुसरी निर्भया होऊ नये, याची खबरदारी आपण सर्वजण नक्की घेऊ शकतो, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली.

आज (शुक्रवार) सकाळी पहाटे साडेपाच वाजता निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्यात आली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुलगा असो वा मुलगी त्याला किंवा तिला कोणत्याही वेळी कुठेही जाण्याची मोकळीक मिळालीच पाहिजे. सत्तेत कुणीही असोत नागरीकांची सुरक्षा आणि त्यांचा न्याय ही सरकारची जबाबदारी असल्याचेही सुळे म्हणाल्या.

फास्ट ट्रॅक कोर्ट असावेत

निर्भया प्रकरण असो की हिंगणघाटची घटना किंवा महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षांत घडलेल्या वेगवेगळ्या घटना असतील त्या अतिशय दुर्दैवी आहेत. माझी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे की, अशा घटनांचा निवाडा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असावेत. आम्ही त्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात लवकरच दिशा कायदा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'दिशा' कायद्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आंध्र प्रदेश व तेलंगणास जाऊन माहिती घेऊन आले आहेत. कोरोना व्हायरसचे संकट दूर झाल्यानंतर दिशा कायदा राज्यात व देशात लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आम्ही सर्वजण आमचे मतभेद दूर ठेवून करणार असल्याचे सुळे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details