मुंबई- शहरातील २०११ च्या जनगणनेमध्ये मराठी टक्का कमी झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाले होते. तत्कालीन आघाडी सरकारच्या धोरणामुळे मुंबईतील मराठी टक्का कमी झाला असल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
आघाडी सरकारच्या धोरणामुळे मुंबईतील मराठी टक्का कमी - मुनगंटीवार
शहरातील २०११ च्या जनगणनेमध्ये मराठी टक्का कमी झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाले होते.
ते म्हणाले, की भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मराठी माणूस टिकावा यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. २०२१ मध्ये जेव्हा जनगणना होईल त्यावेळी निश्चितपणे सरकारच्या कामामुळे मराठी टक्का वाढला असेल, असा विश्वासही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मातृभाषेसंदर्भातला २०११ सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे, त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा वाढल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या अहवालावरून मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईचा प्रवास हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने सुरू असल्याचे एकंदरीत चित्र आहे.