महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुबोध भावे निर्मित पहिली मालिका, ‘शुभमंगल ऑनलाइन’, ची सेंच्युरी

क्रिकेटमध्ये जसे सेंच्युरीला महत्व आहे, तसेच टेलिव्हीजन मालिकांच्या भागांच्या सेंच्युरीला महत्व आहे. किंबहुना मालिका या पहिली सेंच्युरी झाल्यावर दुसरी, तिसरी व अनेक सेंच्युरी मारण्याच्या प्रयत्नात असतात. नुकतीच सुबोध भावे निर्मित पहिली मालिका, ‘शुभमंगल ऑनलाइन’, ची सेंच्युरी झाली व संपूर्ण टीमने तो क्षण उत्साहात साजरा केला.

shubhmangal Online 100 episodes
शुभमंगल ऑनलाइन बातमी

By

Published : Jan 23, 2021, 10:39 PM IST

मुंबई - क्रिकेटमध्ये जसे सेंच्युरीला महत्व आहे, तसेच टेलिव्हीजन मालिकांच्या भागांच्या सेंच्युरीला महत्व आहे. किंबहुना मालिका या पहिली सेंच्युरी झाल्यावर दुसरी, तिसरी व अनेक सेंच्युरी मारण्याच्या प्रयत्नात असतात. नुकतीच सुबोध भावे निर्मित पहिली मालिका, ‘शुभमंगल ऑनलाइन’, ची सेंच्युरी झाली व संपूर्ण टीमने तो क्षण उत्साहात साजरा केला.

शुभमंगल ऑनलाइनची टीम

हेही वाचा -मुलुंडमध्ये जिलेबी फाफडा वाटून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी, अनेक गुजराती बांधवानंचा शिवसेनेत प्रवेश

कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन‘ मालिका सुरू होण्याआधी ती बरीच चर्चेत होती. मालिकेचा विषय खूपच वेगळा, सुयश-सायलीची जोडी देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार होती, तसेच सुकन्या कुलकर्णी मोने या देखील ‘घाडगे अँड सून’ नंतर कलर्स मराठीवर परतणार होत्या. सुबोध आणि मंजिरी भावे यांची निर्माते म्हणून ही पहिलीच मालिका. सद्यस्थिती लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊन बसले आहे. आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत, मने जुळत, मैत्री होत असे. पण, आता मात्र ऑनलाइन लग्नाच्या गाठी देखील जुळल्या जात आहेत.

शंतनू-शर्वरीचा विवाहसोहोळा तर पार पडला, पण त्यांच्या आयुष्यात अचानक ऐश्वर्याच्या येण्याने बरीच उलथापालथ होत आहे. आता शर्वरीच्या साथीने शंतनूला कुटुंबाची साथ कशी मिळेल, शर्वरी त्याला साथ देईल का, ऐश्वर्याचा नक्की हेतू काय आहे, तिचा खेळ शर्वरी-शंतनू उधळून लावू शकतील का, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

शुभमंगल ऑनलाइनची टीम
शुभमंगल ऑनलाइनची टीम

१०० भागांचा पल्ला गाठला

नुकताच ‘शुभमंगल ऑनलाइन‘ मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला. प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य होऊ शकले, असे मालिकेची टीम सांगते. मालिकेतील पात्र, विषय, जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन याचे जंगी सेलिब्रेशन केले. निर्माते मंजिरी व सुबोध भावे आवर्जून सेटवर उपस्थित होते. सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टिमच्या उपस्थितीत केक कापून, सेल्फी काढत या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला व लुटला. ‘शुभमंगल ऑनलाइन’ प्रसारित होते कलर्स मराठीवर, सोमवार ते शनिवार रात्री १०.०० वाजता.

शुभमंगल ऑनलाइनची टीम
शुभमंगल ऑनलाइनची टीम
केक

हेही वाचा -अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसचे प्रमुख नेते घेणार पोलीस आयुक्तांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details