मुंबई -परीक्षा निकाल आणि गुणपत्रकेसाठी कायम वादाच्या भोवऱ्यात सापडणार्या मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा पुन्हा एक नमुना समोर आला आहे. आज अंतिम वर्षाच्या परीक्षेत तांत्रिक अडचण आल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेला मुकावे लागले आहे. तर विद्यार्थ्यांच्या रोषानंतर 9 आणि 14 ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाईल असा खुलासा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार; तांत्रिक अडचणीमुळे अनेक जण परीक्षेला मुकले
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था(आयडॉल) तृतीय वर्षाच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली. यात तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र ६ व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या शाखांच्या परीक्षेचे पेपर होते. यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. मात्र अवेळी परीक्षा सुरु होताच काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्याने त्यांना ही परीक्षा देता आली नाही. त्यामुळे 9 आणि 14 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था(आयडॉल) तृतीय वर्षाच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली. यात तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र ६ व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या शाखांच्या परीक्षेचे पेपर होते. यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. मात्र अवेळी परीक्षा सुरु होताच काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्याने त्यांना ही परीक्षा देता आली नाही दुसरीकडे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता ही परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.
विद्यापीठाच्या या कारनाम्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागला असून याविषयीचा विद्यार्थ्यांकडून आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनानेतृतीय वर्ष बीकॉम ची परीक्षा ९ ऑक्टोबर रोजी व तृतीय वर्ष बीए परीक्षा १४ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती दिली. तसेच आज झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी विद्यापीठाकडून खबरदारी घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र आज घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळाले.