महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' ला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने, तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.

mumbai s.t bus smart card
एसटी बस

By

Published : May 5, 2020, 10:44 AM IST

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू आहेत त्या भागातील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यांमध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेला स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार, एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने, तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली आहे. त्यामुळे, ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details