महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार - मुख्यमंत्री

राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस

By

Published : Feb 27, 2019, 11:46 PM IST

मुंबई - शेती-सिंचन, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद आज (बुधवार) अंतरिम अर्थसंकल्पात सादर करण्यात आली. यातून राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

देशातील आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २०१९-२० या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच शेतकरी, मजूर, महिला, बालके आणि वंचित-उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने गेल्या ४ वर्षात सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना-उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली गेली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details