महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात तणावामुळे एसटीची वाहतूक अंशत:, ३८२ फेऱ्या रद्द

गेली काही दिवस महाराष्ट्र –कनार्टक सीमावर्ती भागात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले आहे. आशा पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार एसटी महामंडळाने आपल्या कर्नाटकात जाणाऱ्या दैनदिन ११५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या पुढील सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव
महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव

By

Published : Dec 7, 2022, 9:42 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुटनाऱ्या एसटी बसेस नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिधुंदुर्ग या जिल्हयातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणाऱ्या सुमारे ५७२ फे-यापैकी ३१२ फेऱ्या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. तथापी, गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोवाल्या जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच, सांगली जिल्हयातील कर्नाटक राज्यात जाणाऱ्या ६० फेऱ्यांपैकी २२ फे-या स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फेऱ्या रद्द केल्या आहेत.

कोल्हापूर शहरातून श्री. क्षेत्र सौंदत्ती येथे सुमारे ७००० भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी बसेस आज मध्यरात्री पर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलीस प्रशासनाने संबधित बसेसला पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आज दत्त जयंती निमित्य राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे दत्त जंयती निमित्त यात्रा, भरवण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून, यात्रा सुरळीत सुरु आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details