महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youth Voters In Maharashtra : युवा मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपाचे विशेष प्रयत्न

महाराष्ट्रातील युवा मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. युवा वर्गाची मतदानाची टक्केवारी वाढवण्याबरोबरच त्यांची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी भाजप विशेष योजना राज्यात राबवत आहे. कर्नाटकमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भाजपने ही मोहीम हाती घेतली आहे.

Youth Voters In Maharashtra
Youth Voters In Maharashtra

By

Published : May 23, 2023, 9:39 PM IST

मधु चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आता येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत धोका पत्करायचा नाही, असं भाजपने ठाम निश्चय केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी युवा मतदारांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपने लक्ष घातले आहे.

राज्यात भाजपकडे मोठ्या प्रमाणात युवा वर्ग :येणाऱ्या लोकसभा, विधानसभा तसेच त्या अगोदर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या प्रमाणात युवा मतदारांची संख्या वाढवण्याचं मोठं आव्हान बीजेपी ने पेललं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाजपचा युवा मतदार असून या मतदाराची नोंदणी झालेली नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं आहे. १८ ते २२ या वयोगटातील फक्त १० टक्केच मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये वाढ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराव्यात यावेत, असेही त्यांनी म्हटलं आहे. त्या अनुषंगाने भाजपने आता प्रयत्न सुरू केले असून त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

२५ लाख युवा वॉरिअर :त्याचबरोबर भाजपतर्फे राज्यात २५ लाख युवा वॉरियर्स तयार करण्यात येणार असून या युवा वॉरिअरचा मतदानामध्ये मोठा फायदा भाजपला होणार आहे. तसेच प्रत्येक बुथवर किमान ५० युवा वॉरिअर जमा करण्याचे काम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा मोर्चाला दिलं आहे. आत्ताच झालेल्या कर्नाटक च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली होती व याच अनुषंगाने भाजपवर टीका होत असून येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका सर्व राज्यांमध्ये भाजपला बसेल असं सांगितलं जात आहे.

कर्नाटकमध्ये झालेला बदल हा अपेक्षित जरी नसला तरी, सुद्धा यापूर्वी अनेक राज्यांमध्ये सत्ता हातातून गेल्यानंतर पुन्हा ती राज्य काबीज करायला भाजपला यश आलं आहे - ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, भाजप

भाजपचा युवा मतदारांसाठी पुढाकार :त्याचबरोबर युवा वर्गाला मतदानाकडे ओढण्यासाठी अनेक उपक्रमही भाजपकडून राबवण्यात येत असल्याचेही मधु चव्हाण यांनी सांगितले आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून राज्यात सरकारकडून अनेक रोजगार शिबिरांच आयोजन करण्यात येत आहे. राज्यात येणाऱ्या काळात एकंदरीत ७५ हजार नोकऱ्या सरकारकडून युवा वर्गाला देण्यात येणार आहेत.

मतदार नोंदनीसाठी भाजपचा पुढाकार :यासाठी विविध ठिकाणी निरनिराळे रोजगार मेळाव्यांच आयोजन केलं जात असून या ठिकाणीही युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत पुढाकार घेतला असून जास्तीत जास्त युवा वर्गाची मतदानासाठी नोंदणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनीही त्यांच्या युवा मोर्चाकडे विशेष लक्ष दिलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत युवा मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करणार यात शंका नाही. तरीसुद्धा मतदानासाठी त्यांची नोंदणी करून घेणे हे महत्त्वाचे असून त्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे.

राज्यातील मतदारांची एकूण संख्या :राज्यात एकूण मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ आहे.
अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९, तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७, तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार ७३५ इतकी आहे. ९ नोव्हेंबर २०२२ च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ इतकी होती. त्यात वाढ होऊन ती ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ७७ हजार ४८३ इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात १५ हजार ३३२ ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
  2. Ajit Pawar On MahaVikas Aghadi : महाविकास आघाडी कायम एकत्र असणार - अजित पवार
  3. UPSC Result 2022 Declares : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; टॉप पाचमध्ये मुलींचाच नंबर, 'असा' पाहा निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details