महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनिया गांधींनी बोलावली विरोधकांची बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची आज (20 ऑगस्ट) बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी 4 वाजता ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

cm
cm

By

Published : Aug 20, 2021, 2:51 AM IST

मुंबई -कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची आज (20 ऑगस्ट) बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी 4 वाजता ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

'हे' मुख्यमंत्री असणार उपस्थित

या बैठकीला विरोधी पक्ष नेते तसेच 4 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे राहणार हजर - राऊत

दिल्लीत विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details