मुंबई - राहुल गांधी देशभरात जिथे प्रचारासाठी गेले तिथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात होईल. असे मत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी शुक्रवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
हेही वाचा -मोदींनी मुंबई दहशतवाद मुक्त केली; योगी आदित्यनाथ यांचा दावा
राहुल गांधी काँगेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असतील तर त्यांच स्वागत करायला हवं. मात्र, त्याआधी त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परदेशी संस्थाच त्यांनी समर्थन का केलं? देशात कोणत्याही निवडणुका नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान का केला गेला? आणि जेएनयूच्या कॅम्पसमध्ये भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यांच काँगेसकडून समर्थन कस केलं गेलं? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला आहे. मोदी हे कायम सकारात्मक राजकारण करतात. मात्र, राहुल किती सकारात्मक राजकारण करतात हे मला चांगले माहीत असल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा -17 दिवसांपासून सरकार झोपलेले का? पीएमसीवरुन चरणसिंगांचा हल्लाबोल
मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती
स्मृती इराणी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती माध्यमांना दिली.
रविवारी 13 ऑक्टोबर रोजी भंडाऱ्यातील जळगाव साकोली येथे मोदींची पहिली प्रचारसभा पार पडेल.