महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंच्या प्रचाराचा भार माजी आमदार, नगरसेवकांसह शिवसैनिकांच्या खांद्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अर्ध्यावर आला आहे. काही उमेदवारांनी प्रचाराची आपली एक फेरी पूर्ण केली आहे. तर काही उमेदवारांनी नुकताच प्रचार सुरू केला आहे. यात ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणूक लढवत असल्याने या मतदार संघाकडे नागरिकांचे विशेष लक्ष आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे.

By

Published : Oct 13, 2019, 5:12 PM IST

मुंबई - शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. याबरोबरच ते शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याने त्यांना राज्यभरात फिरावे लागत आहे. यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार, नगरसेवक व शिवसैनिकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराचा भार माजी आमदार, नगरसेवक व शिवसैनिकांच्या खांद्यावर

हेही वाचा - विधानसभेच्या निकालानंतर होणार एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा फैसला

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार अर्ध्यावर आला आहे. काही उमेदवारांनी प्रचाराची आपली एक फेरी पूर्ण केली आहे. तर काही उमेदवारांनी नुकताच प्रचार सुरू केला आहे. यात ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणूक लढवत असल्याने या मतदार संघाकडे नागरिकांचे विशेष लक्ष आहे. तसेच आदित्य हे शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याने त्यांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रचाराला जावे लागत आहे. अशावेळी आदित्य यांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून रणनीती आखण्यात आली आहे.

हेही वाचा - 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या

वरळी विधानसभा क्षेत्रात सहाही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. या ठिकाणी सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार होते. निवडणुकीत कोणताही दगाफटका नको म्हणून राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्यात आले आहे. तर यासोबतच मतदार संघातील सहाही नगरसेवक, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार व राज्यमंत्री सचिन अहिर यांचा कार्याचा अहवाल घरोघरी मतदारांकडे पोहोचवला जात आहे.

हेही वाचा - बुलडाण्यात विद्यार्थ्यांनी साकारली 'गो फॉर व्होट'ची मानवी रांगोळी

आदित्य यांनी मतदारांना आवाहन केलेले पत्रही घरोघरी पोहोचवल जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. याची सर्व जबाबदारी नगरसेवक, नगरसेविका, माजी आमदार व शिवसैनिकांवर असल्याची माहिती विभाग प्रमुख नगरसेवक आशिष चेंबूरकर व महिला विभाग प्रमुख नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details