मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीतील एका उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
अखेर मुहूर्त ठरला, जुलै महिन्यात होणार शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे भूमीपूजन
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात होणार आहे. शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
असे असणार स्मारक
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील महापौर बंगल्याच्या परिसरात अंडरग्राऊंड असणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. ही झाडे न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारल्या जाणार आहे. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत हे स्मारक तयार करण्यात येईल. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल या वास्तू ही बंगल्याच्या खालीच तयार करण्यात येणार आहेत.