मुंबई :शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी सध्या एकनाथ शिंदे गटात आहेत. महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला अंतरिम समिती उच्च न्यायालयाकडून दिली गेली आहे. शिविगाळ तसेच लोकांना जमवून त्यांनी काही नागरिकांना मारहाण केली तसेच धमकावले होते. दहशत दाखवून गप्प बसा अशी धमकी दिली होती. ह्या प्रकरणात इतर आरोपी देखील होते. फिर्यादी वातीने फौजदारी तक्रार दाखल केल्यानंतर त्याबाबत आमदार महेंद्र दळवी यांच्यासह इतर आरोपींना दोन वर्षाची शिक्षा देखील स्थानिक सत्र न्यायालयाने सुनावली होती.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेला होऊ घातल्या होत्या. आणि दोन गटात तुंबळ बाचाबाची झाली . त्यानंतर हाणामारी देखील झाली. ही हाणामारी महेंद्र दळवी यांच्याकडून केली गेली, असा आरोप करण्यात आला होता. सुमारे 10 वर्षा पूर्वी स्थानिक निवडणुकीच्या वेळी ही घटना घडली होती. त्यांच्या विरोधात स्थानिक पोलिसात फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर हा खटला रायगड सत्र न्यायालयामध्ये चालवला गेला होता. त्यानंतर त्यांना शिक्षा ठोठावली गेली होती. त्यांनीही शिक्षा स्थगिती मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता.