मुंबई -अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्राने ( Actress and model Sherlyn Chopra ) साजिद खान ( complaint against Sajid Khan ) विरुद्ध जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ( Juhu Police Station ) आहे. मी टू मोहिमेअंतर्गत, त्याच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सध्या साजिद खानने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. जोपर्यंत साजिद खान बिग बॉसमध्ये सहभागी आहे. तोपर्यंत शो बंद करावा, अशी मागणीही शर्लिन चोप्राने केली आहे.
वादग्रस्त बिग बॉस 16 मध्ये मीटूचे आरोप असलेल्या साजिद खानच्या प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे. या चित्रपट निर्मात्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्राने सुपरस्टार सलमान खानला शोमध्ये #MeToo आरोपीस स्पर्धक केल्याबद्दल प्रश्न केला आहे. सलमानने आपल्या सुपरस्टारडमचा वापर पीडितांना आवाज देण्यासाठी करायला हवा होता, असे मत शर्लिनने यापूर्वी व्यक्त व्यक्त होते.
साजिद खान बिग बॉसमधून बाहेर पडणार का?लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला साजिद खान सध्या रिअॅलिटी टेलिव्हिजन शो बिग बॉसचा स्पर्धक आहे. साजिदच्या विरोधात गंभीर आरोप असताना त्याला शोमध्ये कसे आमंत्रिक केले गेले याबद्दल अनेकांच्या मनात राग आहे. चित्रपट निर्माता साजिद खानने बिग बॉस 16 मध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून रिअॅलिटी शोमध्ये वाद निर्माण झाले आहेत. येत्या आठवड्यात #MeToo आरोपीला बाहेरचा दरवाजा दाखवला जाईल, असा दावा करणारी बातमी मीडियात असली तरीदेखील नवीन अहवालानुसार तो घरातच राहणार आहे.
शर्लिन चोप्राची साजिद खान विरोधात जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अनेकांना आहे रागसाजिदवर मंदाना करीमी, आहाना कुमरा, कनिष्का सोनी आणि शर्लिन चोप्रा यांच्यासह अनेकांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यात पार्ट्यांमध्ये त्याचे खासगी भाग फ्लॅश करणे, कास्टिंग प्रक्रियेचा भाग म्हणून महिला कलाकारांना त्यांची नग्न छायाचित्रे पाठवण्यास सांगणे आणि महिलांसमोर पॉर्न पाहणे अशा गोष्टींचा समावेश आहे.लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला खान सध्या सलमान खान होस्ट केलेल्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे. साजिदच्या विरोधात गंभीर आरोप असताना त्याला शोमध्ये कसे आमंत्रिक केले गेले याबद्दल अनेकांच्या मनात राग आहे.
याआधीच्या वृत्तात म्हटले आहे की कलर्सने साजिदला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे तर सलमानने त्याची बहीण फराह खानशी चांगले संबंध असल्याने लढाई सुरू ठेवली आहे. साजिदला आठवडाभरात रिअॅलिटी शोमधून बाहेर पडावे लागेल, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे. शोमध्ये साजिदच्या मुक्कामाबद्दलची ताजी चर्चा मात्र वेगळेच सूचित करते."या सर्व निव्वळ अफवा आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही. साजिद खानला बिग बॉस 16 च्या घरातून बाहेर काढण्यात काही तथ्य नाही, तो शोसाठी आहे आणि तो कोणत्याही वेळी बाहेर पडला तर नियमांचे पालन करून बाहेर पडेल.
उर्फी जावेदनेही उपस्थित केला होता प्रश्नयापूर्वी, #MeToo चळवळीदरम्यान साजिदवर आरोप लावणाऱ्या मंदाना करीमीने एका मुलाखतीत सांगितले की, साजिदला शोमध्ये स्थान देण्यात आल्यामुळे तिला आता बॉलिवूडमध्ये काम करण्यात रस नाही. तिच्याशिवाय गायिका सोना मोहपात्रा हिनेही साजिदच्या प्रवेशाबद्दल शोच्या निर्मात्यांना प्रश्न विचारला. उर्फी जावेदने शोमध्ये साजिदच्या वादग्रस्त प्रवेशाचे समर्थन केल्याबद्दल शहनाज गिल आणि कश्मीरा शाह यांची निंदा केली होती.