महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेत एकूण १ लाख २० हजार निवृत्त कर्मचारी आहेत. यातील १ लाख १० हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात सुधारित निवृत्तीवेतन मिळेल.

By

Published : Sep 29, 2019, 9:33 PM IST

मुंबई महानगरपालिका

मुंबई -मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे निवृत्तीवेतनासह थकबाकीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे.

महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. या वेतन आयोगाची अंमलबाजावणी मागील जुलै महिन्यात करण्यात आली. महानगरपालिकेने निवृत्त कर्मचार्‍यांनाही सातव्या वेतन आयोगानुसार वेतन लागू करून दिलासा दिला आहे.

हेही वाचा - 'संभाजी भिडे यांनी या वयात बालिश वक्तव्य करू नये'

मुंबई महानगरपालिकेत एकूण १ लाख २० हजार निवृत्त कर्मचारी आहेत. यातील १ लाख १० हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात सुधारित निवृत्ती वेतन मिळेल. ४२ महिन्यांची थकबाकी दोन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. दहा हजार कर्मचाऱ्यांनी हयातीच्या दाखल्यासह महत्त्वाची कागदपत्रे सादर केलेली नसल्याने ती प्रकरणे सध्या बाजूला ठेवली आहेत. थकबाकीचा उर्वरित हप्ता जुलै २०२० मध्ये दिला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details