महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 12, 2020, 1:06 PM IST

ETV Bharat / state

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे कुटुंबीयही कोरोना पॉझिटीव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून साडे तीन महिन्यांपूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलीवूडमधील सर्व व्यवहार ठप्प होते. शूटिंग आणि इतर कामेही बंद असल्याने बॉलिवूडमधली स्टार मंडळी आपल्या घरातच होते. मात्र, काही दिवसांपूर्वी टाळेबंदीत सवलत दिली गेल्यानंतर बॉलीवूडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Anupam Kher
अनुपम खेर

मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बॉलीवूडमध्येही त्याचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आई, भाऊ आणि वहिनी यांना कोरोनाची लागण झाल्याचे खेर यांनी ट्विटकरून सांगितले.

अनुपम यांच्या आई दुलारी देवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच त्यांचे भाऊ आणि वहिनीचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 'मी माझी कोरोना टेस्ट केली असून अहवाल निगेटिव्ह आला आहे', असे खेर यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून आई दुलारी देवी यांना भूक लागत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला रक्ताची चाचणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे स्कॅन करण्यास सांगितले. त्यावेळी करण्यात आलेल्या कोविड टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती खेर यांनी दिली.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भाऊ आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून साडे तीन महिन्यांपूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलीवूडमधील सर्व व्यवहार ठप्प होते. शूटिंग आणि इतर कामेही बंद असल्याने बॉलिवूडमधली स्टार मंडळी आपल्या घरातच होते. मात्र, काही दिवसांपूर्वी टाळेबंदीत सवलत दिली गेल्यानंतर बॉलीवूडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अभिनेता अमिर खान यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अमीर खान यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची चाचणी केली होती. तसेच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि दिग्दर्शक, निर्माता करण जोहरच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. रेखा यांचा बंगला महानगरपालिकेने सील केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details