महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजीव पुनाळेकरांच्या अटकेचा सनातनकडून निषेध

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना काल अटक केली होती. या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे.

चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन

By

Published : May 26, 2019, 12:02 PM IST

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना काल अटक केली होती. या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे.

चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन

केंद्रात हिंदुत्ववादी सरकार सत्तारूढ असताना पुनाळेकर आणि भावे यांना अटक होणे, यामागे षडयंत्र असल्याचा आरोप सनातनने केला आहे. संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोट प्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवा, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा कळवला आहे, असे सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details