महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Samriddhi Highway : वन्यजीवांसाठी 'समृद्धी महामार्ग' जीवघेणा ; वन्यजीव संस्थेच्या अहवालात धक्कादायक माहिती

समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होणार आहे. या महामार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालात (wildlife agency report submitted) वन्यजीवांसाठी हा मार्ग अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आली (Samriddhi Highway dangerous for wildlife) आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनेत अनेक त्रुटी आहेत.

Samriddhi Highway
समृद्धी महामार्ग

By

Published : Dec 11, 2022, 8:39 AM IST

मुंबई : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Samriddhi Highway) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. वन्यजीवांसाठी हा मार्ग अतिधोकादायक असल्याचा अहवाल वन्यजीव संस्थेने राज्य सरकार आणि एमएसआरडीसी सादर केला आहे. अहवालात (wildlife agency) अनेक शिफारशी यापूर्वी केल्या होत्या. त्या कागदावर राहिल्या असून समृद्धी महामार्गात मात्र कोणताही बदल केला नसल्याचे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईला वेगात जोडणारा हा मार्ग वन्यजीवांसाठी जीवघेणा (Samriddhi Highway dangerous) ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



सुरक्षेसंदर्भात उपाययोजना : राज्याच्या आर्थिक राजधानीला उपराजधानीने जोडण्यासाठी मुंबई ते नागपूर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेलू ते नागपूरमधील शिवमडका हे २१० किलोमीटरचा सर्वांसाठी खुला होणार आहे. या महामार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. समृद्धी महामार्गाच्या निर्मितीवेळी परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला कंत्राट दिले होते. दरम्यान, समृद्धी महामार्गांवर तब्बल ११५ किलोमीटरच्या टप्प्यात वन्यजीवांचा अधिवास असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आले (Samriddhi Highway dangerous for wildlife) आहे.



उपाययोजनेत अनेक त्रुटी :उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळातील तज्ज्ञांनी अधिवासाची पाहणी केली होती. या समितीने भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या शिफारशींमध्ये सुधारणा करत प्राणी संरक्षणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. आता राज्य वन्यजीव मंडळाने ही सूक्ष्म नियोजन करून उपाययोजना सुचवल्या. मात्र, एमएसआरडीसीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने वन्यजीव संस्थेने नव्या शिफारशी सरकारला दिल्या आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनेत अनेक त्रुटी (wildlife agency report submitted) आहेत.

अपघातांचा प्रश्न ऐरणीवर :समृद्धी महामार्गावर १५० कि.मी. प्रतितासपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवण्याची मुभा आहे. एखादा प्राणी अशा वेळी मार्गावर आल्यास होणाऱ्या दुर्घटनांचे काय? त्रुटी दुरुस्त न केल्यास वन्यजीवांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर येईल. त्यामुळे भारतीय वन्यजीव संस्थेने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात हयगय का झाली? राज्य वन्यजीव सुरक्षा मंडळाने सुचवलेल्या शिफारशींबाबत ठोस भूमिका घेण्यात आली का? अशा प्रश्नांचा भडिमार अहवालातून केला आहे. एमएसआरडीसीने वन्यजीव संस्थेला अद्याप याबाबत खुलासा केला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे (report submitted to state government and MSRDC) आहे.



एमएसआरडीसीला अहवाल :वन्यजीव संस्थेने एमएसआरडीसीला अहवाल दिला आहे. मात्र, यावर मला काही बोलायचे नाही, असे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले. तर एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details