मुंबई - महाविद्यालयात होणारे संशोधन जगासमोर दाखवण्यात यावे विद्यार्थ्यांना ई-यंत्र संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी. या उद्देशाने आयआयटी मुंबईत ई-यंत्र रोबोटिक्स प्रकल्पाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये देशातील निवडक महाविद्यालयाचा सहाभाग असून महाराष्ट्रतील १० महाविद्यालयाचा सहभाग असणार आहे.
आयआयटी मुंबईत स्वदेशी बनावटीचे ई-यंत्र रोबोटिक्सचे प्रदर्शन - e-machine
महाविद्यालयात विद्यार्थाना संशोधनात येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि विध्यार्थी यांच्या कल्पना यांना चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. ई-यंत्र आणि रोबोटिक्स संशोधनातून किचकट काम लवकर रोबोट करणार आहे.
महाविद्यालयात विद्यार्थाना संशोधनात येणाऱ्या अडचणी त्यावर उपाय आणि विध्यार्थी यांच्या कल्पना यांना चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. ई-यंत्र आणि रोबोटिक्स संशोधनातून किचकट काम लवकर रोबोट करणार आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक बचत मोठया प्रमाणावर होणार आहे. प्रा. कवी आर्या म्हणाले ही स्पर्धा २०१५ मध्ये देशभरातील महाविद्यालयातून सुरू केली होती. त्यांच्याकडून रोबोटिक्स व ई-यंत्रचे व्हिडिओ मागवण्यात आले होते. त्यात ५१ महाविद्यालयाने सहभाग घेतला होता व १०४ प्रकल्प सहभागी झाले होते.
३६२ प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यातुन ६४ प्रकल्प अंतिम टप्प्यात घेण्यात आले होते. त्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी व त्यावर सखोल संशोधनासाठी ई-यंत्र लॅब व प्रशिक्षित शिक्षक व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देशभरातील महाविद्यालयात देण्यात आले होते. यातून २१ प्रकल्पाचे निवड नोएडा, पुणे, मुंबई, नवीमुंबई, कोईबतूर, वडोदरा, गुजरात येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प प्रदर्शनात सादर केले आहे. ५ आणि ६ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. २१ प्रकल्पातून जो प्रकल्प निवडला त्यास ५ लाख रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आयआयटी मुंबईच्या संचालिका स्मिता घोलकर म्हणाल्या, आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागात हे प्रकल्प चालवले जातात. इवायआरसी यांनी इयंत्र रोबोटिक्स कॉम्पीटीशन आणि ई वाय आय सी यांनी ई-यंत्र आयडियास कॉम्पिटिशन प्रकल्पाला भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयमार्फत अर्थसहाय्य मिळते. या प्रदर्शनात आसाम येथील एक प्रकल्प प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आला आहे. त्याचे वैशिष्ट्ये असे की, संरक्षण विभागात हा रोबोटिक्स यंत्र हेझर्ड गॅस शोधून काढतो. आणि दुसरा एक गुजरातचा आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट शहरातील पाण्याची व्यवस्था सुरळीत ऑटोमॅटिक पणे इयंत्र कश्या प्रकारे राबवता येते. यावेळी खारघर येथील एस पी पाटील महाविद्यालयाने विजेची गळती रोखण्यासाठी इयंत्र ऑटोमॅटिक जनरेटर बनवले आहे.