महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदू मिलचे काम लवकरच पूर्ण होणार - रामदास आठवले

लवकरच इंदू मिलचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

By

Published : Apr 14, 2019, 5:29 PM IST

इंदू मिलचे काम लवकरच पूर्ण होणार - रामदास आठवले

मुंबई- सर्वप्रथम सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देणारे तसेच जनमानसात रुजलेले आहेत. बाबासाहेबांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाला सुरुवात झालेली आहे. त्याचा आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. लवकरच इंदू मिलचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

इंदू मिलचे काम लवकरच पूर्ण होणार - रामदास आठवले

इंदू मिलचे काम २०२० पर्यंत पूर्ण होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी पाठपुरवा सुरू असल्याचेही आठवलेंनी सांगितले. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अनेक चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे महायुतीची सत्तेत येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमध्ये ४१ कोटींचे घर होते. त्या बंगल्यात बाबासाहेब १९२० - २१ मध्ये राहत होते. राज्यसरकारने तो बंगला विकत घेतला आहे. त्याबरोबरच इंदू मिलचीही जागा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर बांधकामासाठी देण्यात आली. तसेच अट्रॉसिटी कायद्याला संरक्षण मिळाल्याने दलित समजाला न्याय मिळाला.

राज ठाकरेंच्या सभेच्या गर्दीचे मतात रुपांतर होणार नाही-

राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होत आहे. मात्र, त्या गर्दीचे मतात रूपांतर होणार नाही. राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी मी अजिबात प्रयत्न करणार नाही, कारण त्यांना इकडे आणण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे नाराज होतील, असेही आठवलेंनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details