महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार राम कदमांचे ठिय्या आंदोलन मागे; संजय राऊतांवरील कारवाईची मागणी कायम

सातारा व मुंबई येथून संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून, त्यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले जात आहेत.

By

Published : Jan 16, 2020, 12:02 PM IST

Updated : Jan 16, 2020, 12:28 PM IST

ram-kadam-on-sanjay-raut
आमदार राम कदमांचे ठिय्या आंदोलन; संजय राऊतांवर कारवाईची मागणी

मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये 'माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा.' असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे सर्व शिवप्रेमींचे मन दुखावले असल्याचे सांगत भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन निषेध नोंदवला आहे. आता मात्र त्यांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे.

आमदार राम कदमांचे ठिय्या आंदोलन मागे; मात्र संजय राऊतांवर कारवाईची मागणी कायम

हेही वाचा - 'होय... मी दाऊदला भेटलोय आणि दमही दिलाय'

सातारा व मुंबई येथून संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून, त्यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले जात आहेत. संजय राऊत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना 'मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्याच्याशी बोललोय, इतकेच नाही तर त्याला दमही दिला आहे', असा गौप्यस्फोट केला होता. यावरुन राम कदम यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, 'कोण कोणत्या नेत्याचे व गुंडाचे संबंध होते? हा खुलासा राऊत यांनी करावा.' तसेच पोलिसांनी राऊतांवर कारवाई करावी याकरता आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या दिला आहे.

आमदार राम कदमांचे ठिय्या आंदोलन; संजय राऊतांवर कारवाईची मागणी

संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्या विरोधात त्यांनी माफी मागावी. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाही करावी व जोपर्यंत कारवाही होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा पवित्रा आमदार राम कदमा यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

हेही वाचा - शिवाजी महाराजांची उपाधी 'छत्रपती' हीच होती, 'जाणता राजा' नव्हे - शरद पवार

Last Updated : Jan 16, 2020, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details