महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2023, 9:24 PM IST

ETV Bharat / state

Rakhi Sawant Inquiry In Mumbai : राखी सावंतची पोलिसांकडून तब्बल सहा तास चौकशी; वाचा, काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. राखी सावंत विरोधात मॉडेल महिलेने आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू आहे. तब्बल 6 तासाच्या चौकशी नंतर राखी सावंत आंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर आली. चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सहकार्य केले. पुन्हा पोलिसांनी बोलाविल्यास तिला चौकशीला हजर रहावे लागेल.

Rakhi Sawant Inquiry In Mumbai
राखी सावंत हात जोडून चाहत्यांना अभिवादन करताना

राखी सावंत हात जोडून चाहत्यांना अभिवादन करताना

मुंबई :अंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदार मॉडेलच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दोघींची परस्परांविरोधात तक्रार : अभिनेत्री राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत, अधिवक्ता फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

राखीच्या अटकेची मागणी : शर्लिन चोप्राने ट्विट करत राखीच्या अटकेची मागणी केली आहे. नुकतेच राखीने आईच्या आजारपणाची व्यथा मांडली. राखी सावंतची आई कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. अशा काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राखीच्या आईच्या उपचारात मदत केली आहे. यापूर्वी सलमान खानने मोठी मदत केली होती. एकीकडे राखीला वैवाहिक जीवनाची चिंता आहे. तर दुसरीकडे राखीची आई आजारी आहे.

निकाहमुळे आली चर्चेत : ड्रामा क्विन राखी सावंतचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत विवाह झाला आहे. सोमवारी आदिल खानने लग्न अधिकृत असल्याचा खुलासा केला आहे. राखी सावंतने सार्वजनिक ठिकाणी हौशी फोटोग्राफर्स समोर रडण्याचा ड्रामा केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यापार्श्वभूमीवर आदिलचा हा खुलासा समोर आला होता. यापूर्वी, राखीने एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती आदिलला हार घालताना दिसली होती. तिच्या प्रियकरासह तिचा एक व्हिडिओ पुन्हा शेअर केला होता. एक काझी समारंभाचे संचालन करत असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये राखीने हलका-गुलाबी रंगाचा शरारा परिधान केला होता, तर आदिल कॅज्युअल वेअर, ब्लॅक टी आणि ब्लू डेनिम परिधान केला होता.

राखी सावंतने स्वीकारला इस्लाम : फिल्मी जगतातील सर्वात वादग्रस्त, ड्रामा क्वीन राखी सावंतने प्रियकर आदिल दुर्राणीसोबत लग्न करून आपला नवीन मुक्काम निश्चित केला आहे. दोघेही बराच काळ एकत्र होते. 24 तास प्रकाशझोतात राहिल्यानंतरही राखीने आदिलसोबत गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. गेल्या काही दिवसांपासून राखी, आदिलच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ पुरावा म्हणून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :Rakhi Sawant Accepts Islam: 'आता परिणाम भोगायला तयार राहा'.. राखी सावंतला हरिद्वारच्या परशुराम आखाड्याकडून धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details