मुंबई-कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ बील देऊन कोरोना रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे. आरोग्यमंत्र्यांनी खासगी कोविड रुग्णालयातील बिलं सरकारी ऑडिटर तपासणार असल्याचे सांगितले आहे. खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ बील देऊन कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले होते.
कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बिल) होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महापालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 37 रुग्णालयांतील 625 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.