महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये 'रेझिंग डे' निमित्त शालेय विद्यार्थ्यांना कायद्याचे मार्गदर्शन

माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 ला पोलीस दलाला स्वतंत्र ध्वज देण्यात आला. त्या दिवसापासून पोलिसांकडून 2 ते 7 जानेवारीपर्यंत सप्ताह दिवस साजरा केला जातो. वनिता विकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना यावेळी 'रेझिंग डे'बाबत माहिती देण्यात आली. शहरात वाढणारे गुन्हे, अपघात, दरोडे, मुलांचे होणारे अपहरण याबाबत माहिती देण्यात आली.

raising day celebration
रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना कायद्याचे मार्गदर्शन

By

Published : Jan 7, 2020, 12:40 PM IST

मुंबई -घाटकोपर रेल्वे पोलीस बल आणि लोहमार्ग पोलिसांच्यावतीने मुंबई उपनगरात रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोमवारी घाटकोपर पूर्वच्या वनिता विकास हायस्कूलच्या आठवी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस दलाकडून कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

घाटकोपरमध्ये रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना कायद्याचे मार्गदर्शन

माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 ला पोलीस दलाला स्वतंत्र ध्वज देण्यात आला. त्या दिवसापासून पोलिसांकडून 2 ते 7 जानेवारीपर्यंत सप्ताह दिवस साजरा केला जातो. वनिता विकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना यावेळी रेझिंग डे बाबत माहिती देण्यात आली. शहरात वाढणारे गुन्हे, अपघात, दरोडे, मुलांचे होणारे अपहरण याबाबत माहिती देण्यात आली.

मोबाईल हे संपर्काचे साधन आहे. मात्र, या मोबाईलने माणसाचे अनेकदा जीव घेतले आहे. आता तर नव्या नव्या येणाऱ्या गेमने मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर करू नका. प्रमाणात वापर करा, असे आवाहन आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अखिलेश पुरोहित यांनी केले. यावेळी जीआरपीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, राकेश मिश्रा, वनिता विकास शाळेचे मुख्याध्यापक विलास शेट्टे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details