महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात पावसाची संततधार सुरूच राहणार, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या 16 जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

By

Published : Jun 15, 2020, 8:05 PM IST

राज्यात पावसाची संततधार सुरूच राहणार
राज्यात पावसाची संततधार सुरूच राहणार

मुंबई - मान्सून राज्यात स्थिरावला असून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या 16 जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 19 जूनपर्यंत महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल उत्तर अरबी समुद्राच्या, गुजरात राज्याच्या आणखी काही भागात, दिवच्या संपूर्ण भागात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात, छत्तीसगढ, झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. राज्याच्या संपूर्ण भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा - कणकवली 8, पालघर 4, लांजा, माणगाव 6 प्रत्येकी, सावंतवाडी, वालपोई 5 प्रत्येकी, मोखेडा, मुरुड, केप, रत्नागिरी 4 प्रत्येकी, कानकोना, चिपळूण, डहाणू, खेड, महाड,
मुंबई (कुलाबा), पेडेणे, फोंडा, राजापूर, संगमेश्वर देवरुख, वैभववाडी 3 प्रत्येकी, दापोली, खालापूर, कुडाळ, मालवण, मंडणगड, पेण, रामेश्वराग्री, सांगे, श्री वर्धन 2 प्रत्येकी.
मध्य महाराष्ट्र - गगनबावडा, महाबळेश्वर 5 प्रत्येकी, पाथर्डी 4, आजारा, खटाव, वडूज, पन्हाळा, यवल प्रत्येकी, पुरंदर सासवड, राधानगरी, शाहूवाडी, वेल्हे 2 प्रत्येकी,
मराठवाडा -धर्मबाद, परभणी, सेनगाव 3 प्रत्येकी, जळकोट, लातूर, पालम 2 प्रत्येकी.
विदर्भ - चंद्रपूर 6, नागपूर एपी, सेलू 4 प्रत्येकी, बल्लारपूर, भद्रावती, चिखलदरा, कळंब, मोर्शी 3 प्रत्येकी, चांदूर बाजार, चिमूर, देवळी, दिग्रस, हिंगणघाट, मालेगाव, मंगळूरपीर, नेर, वरोरा, वाशिम 2 प्रत्येकी.
घाटमाथा - कोयना (पोफळी) ३, शिरगाव, दावडी, कोयना (नवजा), ताम्हिणी र प्रत्येकी, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफीस), शिरोटा, वळवण, डुंगरवाडी, खोपोली 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :
15 जून : कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
16 जून : कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
14-18 जून : कोंकण गोठ्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
19 जून : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
इशारा :
15 जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. कोंकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
17 जून : कोंकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
18-19 जून : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मुंबई : तापमान
मुंबई (कुलाबा) कमाल तापमान (32.2), किमान (25.5 )
मुंबई (सांताक्रूझ) कमाल तापमान (32.9 ), किमान (27)
मागील 24 तासातील पर्जन्यमान मुंबई (27.6 मिमी)
हंगामातील पाऊस 1 जून पासून मुंबई (251.3 मिमी)
आर्द्रता : 94 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details