मुंबई-सकाळपासूनच मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंत केले.
मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत
सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंत केले.
मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत
मुलुंड परिसरात पावसाची संततधार कोसळत आहे. पावसामुळे सहयाद्री विद्यामंदिर आणि पराग विद्यालयातील विध्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने घरी सोडले . संततधार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिट उशिराने चालू आहे. परिसरातील पाण्याचा निचरा होणाऱ्या जागोजागी पालिकेचे कर्मचारी उभे राहून नागरिकांना उघड्या गटारांपासून सतर्क करत आहेत.
Last Updated : Aug 3, 2019, 6:33 PM IST