महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Railway Police Force Mumbai : रेल्वे पोलीस दलाने 23 हजार 100 रुपये किमतीचे हरवलेले सामान केले परत

मुंबई रेल्वे (Mumbai RAilway Police) मधील मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी 23 हजार 100 रुपये किमतीचे हरवलेले सामान परत मिळवले ( Railway Police force recovered the lost goods). (Railway Police Force Mumbai) प्राप्त सामान संबंधित प्रवाशाला देण्यात (Lost baggage returned to passenger) आले. दोन महिला प्रवासी आणि एक पुरुष प्रवासी अशा तिन्ही व्यक्तींचे हे सामान मुंबई सेंट्रल ते चर्चगेट रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये हरवलेले होते. (Latest news from Mumbai)

Railway Police Force Mumbai
प्रवाशांचे विसरलेले सामान परत करताना रेल्वे पोलीस

By

Published : Jan 9, 2023, 2:47 PM IST

मुंबई :अशा रीतीने पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये घटना घडलेली होती. रेल्वे सुरक्षा जवान (Mumbai RAilway Police) आपल्या ड्युटीवर असतानाच 23 हजार 100 रुपयाच्या महत्त्वाच्या किमतीचे सामान चर्चगेट आणि मुंबई रेल्वे स्टेशन या दोन्ही रेल्वे स्थानका दरम्यान लोकलमध्ये काही प्रवासी विसरले होते. (Railway Police Force Mumbai) या बेवारस बॅग संदर्भात लोकांनी रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना कळवले. (Lost baggage returned to passenger) बेवारस बाग असल्यामुळे नागरिकांनी त्या बॅकला हात लावला नाही. त्यामुळे तशीच राहिली. (Railway Police force recovered the lost goods)


रेल्वे पोलिसांचा प्रामाणिकपणा :मात्र रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी तात्काळ या लोकल ट्रेनमधील ही बेवारस बॅग ताब्यात घेतली आणि त्यामधील सामान साहित्य आणि कागदपत्रे पाहून संबंधित रेल्वे प्रवाशांना त्यांनी तात्काळ संपर्क केला. संपर्क केल्यानंतर त्यांच्या बॅग त्यांना परत करण्यात आल्या. या दोन्ही बॅगची एकूण आणि त्यामधील सर्व किंमत पाहता 23 हजार 100 रुपये इतकी होती. एवढ्या मुद्देमालासकटच्या बॅग रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी त्या प्रवाशांना परत केल्या.


प्रवाशांकडून पोलिसांचे आभार :यामध्ये दोन महिला प्रवासी अनेक पुरुष प्रवासी अशा तीन प्रवाशांचे महत्त्वाचे सामान त्यामध्ये होते. ज्या दोन पर्स होत्या त्या दोन महिलांच्या होत्या आणि एक बॅग आणि त्यामध्ये लॅपटॉप जो होता तो पुरुष प्रवाशाचा होता. त्यांचे सामान त्यांना परत केल्यामुळे त्यांनी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांचे आभार मानले.


रेल्वे पोलिसांवरील विश्वास वाढला :या संदर्भात नितेश अग्रवाल या प्रवाशाने सांगितले की," लोकल ट्रेनमध्ये बॅग राहिली होती आणि मी विसरलो होतो आणि नंतर लक्षात आले आणि मग प्रवाशांच्या सोबत बोलून माहिती घेतली. रेल्वे सुरक्षा दलाकडे त्याबद्दल विचारणा केली आणि त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा लॅपटॉप आणि हे समान परत मिळाले. रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी त्वरेने हे सामान परत मिळवून दिले त्यामुळे आमचा रेल्वे पोलीस जवानांवरील विश्वास अजून वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मुंबई पोलीस दलामध्ये रेल्वेवरील पोलीस अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावतात, हे यातून दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details