मुंबई- राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला. त्यांनी अध्यक्ष पदाबाबत मत जाणून घेतले. त्यांनी फोनद्वारे सविस्तर चर्चा केली. शरद पवार यांनी राजीनामा बाबतचा फेरविचार करावा राजीनामा मागे घ्यावा अशा प्रकारची विनंती त्यांनी केली.
शरद पवारांनी राजीनामा का दिला याबाबतची देखील भूमिका त्यांनी समजून घेतली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केला होता. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि सुप्रिया सुळे यांची फोनवर पवारांच्या राजीनामा संदर्भात चर्चा झाली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील फोन केला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ते सामान्य कार्यकर्ता निर्णयाचा फेरविचार करण्यासंदर्भात विनंती करत आहेत. पण देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून देखील याबाबत फोनवरून संपर्क केला जात असल्यामुळे पवारांचे राजकारणातील स्थान लक्षात येत आहे. यावरून देखील आता राजकीय चर्चा वाढल्या आहे.
सुप्रिया सुळे या पुढील अध्यक्ष असू शकतात-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील पक्षाचा अध्यक्ष कोण यावरती गेल्या दोन दिवसापासून पक्षाच्या बैठका सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाच मे रोजी पक्षाला नवीन अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष मिळू शकतो अशी माहिती समोर येत आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे या पुढील अध्यक्ष असू शकतात, अशी शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
देशभरात विरोधकांची एकजूट करण्यासाठी पवारांचा असतो पुढाकार-यापूर्वी देशभरात विरोधी पक्षांची एकजूट घेण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विविक्ष पक्षांच्या एकत्रित आणत भाजपविरोधात लढण्यासाठी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीदेखील झाल्या होत्या. असे असले तरी नुकतेच शरद पवारांनी अदानींची संसदीय चौकशी होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे विरोधकांमधील एकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर शरद पवारांनी अदानी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी होणे अधिक योग्य ठरेल, असे म्हटले होते. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता.
हेही वाचा-Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी राजीनामा का दिला? सामनामधून ठाकरे गटाने उपस्थित केले दोन प्रश्न