महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत मुस्लिम समाजाकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध ; दुकाने बंद ठेऊन वीर जवानांना श्रद्धांजली

मुंबईतील भेंडी बाजार येथे पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजातील लोकांनी निदर्शने केली.

By

Published : Feb 15, 2019, 9:11 PM IST

हल्ल्याचा निषेध करताना मुस्लिम समाजातील लोक

मुंबई- भेंडी बाजार येथे पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजातील लोकांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम मौलाना आणि मुस्लिम लोकांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पुलवामा हल्ल्याचा तत्काळ बदला घ्या, अशी मागणी केली. या हल्ल्याचा निषेध करत आज वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

जम्मू कश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले. हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी दुकाने बंद ठेवली. यावेळी वीरमरण आलेल्यांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

हल्ल्याचा निषेध करताना मुस्लिम समाजातील लोक
पुलवामा हल्ल्यासारखी घटना पुन्हा घडू नये. ते ज्या संघटना घडवतात त्यांना तत्काळ सर्जीकल स्ट्राईक करून मुळातून उखडावे. या हल्ल्यात वीरमरणांचा बलिदान व्यर्थ न जाता जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदविरोधात त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details