मुंबई :देशात यंदा चना आणि मूग डाळीचे मुबलक उत्पादन झाले आहे. त्यामुळे डाळिंच्या बाबतीत भारत आता स्वयंपूर्ण होत चालला आहे. चना आणि मूग डाळीचे उत्पादन हे मागणीपेक्षा अधिक होत आहे. यंदा देशात सर्व डाळींचे सुमारे 275 लाख मॅट्रिक टन इतके उत्पादन झाले आहे. यामध्ये चणा आणि मुगडाळ आघाडीवर आहे मात्र अजूनही लोकांच्या मागणी इतकी दूर उडीद आणि मसूर डाळ उत्पादित होत नाही लवकरच यासंदर्भात ही भारत स्वयंपूर्ण होईल असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे. ज्या प्रमाणात भारतातील डाळींच्या उत्पादनाचे आकडे वाढत आहेत त्याचप्रमाणे डाळींच्या मागणीच्या आकड्यातही वाढ होत आहे देशातील डाळ उत्पादनातील एकूण उलाढाल दोन लाख कोटींच्या आसपास असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विमल कोठारी यांनी दिली.
डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन :देशात सध्या चणाडाळ आणि मुगडाळ यांचे मुबलक उत्पादन झाले आहे. तरीही देशातील चणाडाळीचे दर स्थिर असले तरी अद्याप कमी झालेले नाहीत त्यामुळे चणाडाळीच्या आयातीवर 66% आयात कर लावण्यात आलेला आहे. तर मूग डाळीच्या आयातीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. देशात तूर डाळीचे उत्पादन आणि मागणी यामध्ये अजूनही सात लाख टनाचा तुटवडा आहे त्यामुळे म्यानमार, मुजांबिक, तांझानिया सारख्या पूर्व आफ्रिकन देशांमधून डाळ आयात करावी लागत आहे उडीद डाळीच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये सुमारे पाच लाख टनाचा फरक आहे. तर मसूर डाळीचा ही मागणी आणि उत्पादनात आठ लाख टनांची तफावत सध्या आहे. त्यामुळे या डाळींचे जास्तीत जास्त देशात उत्पादन व्हावे, यासाठी सरकारच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहितीही कोठारी यांनी दिली.
डाळींच्या उत्पादनासाठी तीन दिवसीय परिषद :दरम्यान डाळींच्या उत्पादन आणि पुरवठा विषयी तीन दिवसीय परिषद इंडिया पल्स अँड ग्रेन्स असोसिएशन आयोजित केली आहे. ही परिषद लवकरच मुंबईत होणार आहे. या परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या वतीने अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहे तर डाळ उत्पादन करणाऱ्या वीस देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती कोठारी यांनी दिली. वातावरणाचा परिणाम, प्रदूषण तसेच डाळ उत्पादनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. तसेच भारत आणि अन्य देशांमधील व्यापारांच्या संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या परिषदेचा नक्कीच उपयोग होईल, असा दावा कोठारी यांनी केला आहे. भारतात जास्तीत जास्त डाळींचे उत्पादन होऊ शकते. याचा विश्वास अन्य देशांना आहे भारतातील प्रगत शेती तंत्रज्ञान आणि केंद्रीय योग्य धोरणामुळे भारत लवकरच डाळिंच्या बाबतीत स्वयंपूर्ण भावा यासाठी या परिषदेत सर्व बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
काय आहे सध्या देशातील मागणी आणि पुरवठा?देशात सध्या 137 लाख टन चना डाळीचे उत्पादन झाले असून 90 लाख टन चणाडाळीची मागणी असते. 34 लाख टन मूग डाळीचे उत्पादन झाले असून तीस लाख टन मूगडाळीची मागणी ग्राहकांकडून येते. उडीद डाळीचे उत्पादन तीस लाख टन झाले असून सुमारे 35 लाख टन मागणी असते. तूर डाळीचे उत्पादन 38 लाख टन इतके झाले असून 45 लाख टनांची मागणी होते तर मसूर डाळीचे उत्पादन बारा लाख टन झाले असून वीस लाख टनाची मागणी ग्राहकांकडून केली जाते. अशी माहिती कोठारी यांनी दिली.
हेही वाचा :Mahashivratri 2023 : हरहर महादेव...महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी