महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील 100 वर्ष जुन्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात

मुंबईत चिंचपोकळीचा चिंतामणी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. रविवारी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन मोठ्या जल्लोषात होत असून यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळत आहे.

सुरुवात

By

Published : Aug 11, 2019, 5:46 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. 2 सप्टेंबरला यंदा गणेश चतुर्थी असल्याने सार्वजनिक आणि घरागुती गणपतीचे यादिवशी आगमन आणि प्रतिष्ठापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तयारीला सुरूवात झाली आहे. मुंबईत चिंचपोकळीचा चिंतामणी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. रविवारी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन मोठ्या जल्लोषात होत असून यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळत आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणीचे जल्लोशात स्वागत


चिंतामणी गणपतीच्या आगमनामुळे सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. गणेशभक्तांकडून मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सुरू आहे. गणरायासाठी मंडप सजविण्यात आला आहे. सोबतच ढोल ताशांचा गजरही करण्यात आला आहे.


मुंबईतील चिंतामणी गणेश मंडळाने रविवारी वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण, झांज पथकांचा आवाज आणि गणपत्ती बाप्पा मोरया... असा जयघोष पाहून गणेशभक्तांसह उपस्थितांचाही उत्साहण द्विगुणीत होताना यावेळी दिसत होता. एकीकडे महाराष्ट्रामध्ये पूर आहे, त्याच्यासाठी चिंतामणी मंडळाने 5 लाखाची मदत केली असून आगमनाला येणाऱ्या सर्व भक्तांना मदत करण्याचे आव्हान देखील केले आहे. जमा झालेला मदतनिधी ते मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details