मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुका काही तासांवर आहेत. यासाठी मुंबईतील घाटकोपर पश्चिम 169 विधानसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांचे वितरण आज (रविवार) विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगर मतदान कार्यालयातून निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्तात वितरित करण्यात आले.
घाटकोपर पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज - राज्य विधानसभा निवडणुका
घाटकोपर पश्चिम 169 विधानसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांचे वितरण आज (रविवार) विक्रोळी पश्चिम येथील वर्षानगर मतदान कार्यालयातून निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्तात वितरित करण्यात आले.

राज्यातील निवडणुकीसाठी प्रचार काल (शनिवार) सायंकाळी संपला. यानंतर लगबग असते ती मतदानाची आज जरी प्रचार उघड नसला तरी छुप्या पद्धतीने उमेदवार व कार्यकर्ते करतच असतात. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 289 मतदान केंद्र आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने नेमून दिलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना विक्रोळी पश्चिम वर्षा नगर येथील निवडणूक कार्यालयातून ईव्हीएम व्हीव्हीपॅट व इतर अत्यावश्यक साहित्याचे वितरण शस्त्रधारी पोलीस कर्मचाऱ्यासह करण्यात आले. यावेळी मतदान यंत्र घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन तयार