मुंबई : पोलिसांवरील ताण-तणावाची चर्चा नेहमीच होते. प्रत्यक्षात ताण-तणावामुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यूदेखील होतात. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान कार्यरत असल्याचे पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाल्याने पोलिसांमधील ह्रदयविकाराच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.
सांताक्रुझ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुजित पवार यांना आझाद मैदान येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंदोबस्त ड्युटी देण्यात आली होती. कामावर असताना दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. ही माहिती समजताच सहकाऱ्यांनी त्यांना गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत कमालीचा उशीर झाला होता. डॉक्टरांनी बोबडे यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्ताचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन :गेल्या आठवड्यात यलो गेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) नितीन बोबडे यांचे ५५ व्या वर्षी निधन झाले. ते पोलीस कार्यालयात असतानाच दुपारी 2 ते 4 वाजताच्या सुमारास सेवेत असतानाच त्यांचे निधन झाले. ते एसीपी नितीन बोबडे सकाळी 10 वाजताच्या सुमारास कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बोबडे यांनी जेवण केल्यानंतर ते आपल्या कक्षात विश्रांती घेत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आला होता.