मुंबई - पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना आज सोमवारी मुंबईमधील दिवाणी न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर पीएमसी खातेधारकांनी येऊन पुन्हा एकदा आंदोलन केलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपींना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी पीएमसी बँक खातेधारकांनी केलेली आहे.
पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे या आरोपींना जामीन न देता शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खातेधारकांनी केली
गेल्या १० वर्षांपासून पीएमसी बँकेला 'ए' ग्रेड दिलेली आहे. त्यामुळे आता बँक बुडीत निघाली आहे. त्यामध्ये आमचे लाखो रुपये अडकले आहेत. मुलीचे लग्न आहे आणि मुलाचे एमबीएचे शेवटचे वर्ष आहे. पैसे बँकेत अडकले आहेत, तर आता मुलीच्या लग्नाचा खर्च कोण करणार? तसेच मुलाची महाविद्यालयातील शुल्क कोण भरणार? असा सवाल खातेदारांनी उपस्थित केला आहे. तसेच अशा 'ए' ग्रेड मिळालेल्या बँकांची यादी रिझर्व्ह बँकेने जाहीर करण्याची मागणी देखील खातेधारकांनी केली आहे.
काय आहे पीएमसी बँक घोटाळा -
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली. बँकींग नियामक कायद्याच्या कलम (३५ A) नुसार कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी, जॉय थॉमस यांनी सांगितले. रिझव्र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसीमध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली. त्यामुळे बँकेत ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.