महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान एनआरसी, सीएए विरोधात घोषणा

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी) विरोधाचे पडसाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पहायला मिळाले. 'नो सीएए', 'नो एनआरसी' असे विरोध दर्शवणारे टी-शर्ट घालून काही प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल झाले.

By

Published : Jan 14, 2020, 6:22 PM IST

सामन्यादरम्यान एनआरसी, सीएए विरोधात घोषणा
सामन्यादरम्यान एनआरसी, सीएए विरोधात घोषणा

मुंबई - मागील काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात निदर्शने सुरू आहेत. मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात देखील याचे पडसाद पहायला मिळाले. प्रेक्षकांनी सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणारे टी-शर्ट घातलेले पहायला मिळाले.

सामन्यादरम्यान एनआरसी, सीएए विरोधात घोषणा

हेही वाचा - सनरायजर्स हैदराबादने 'या' कंपनीसोबत केला 'टायटल स्पॉन्सरशिप'चा करार
'नो सीएए', 'नो एनआरसी' असे विरोध दर्शवणारे टी-शर्ट घालून प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल झाले. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान विरोध व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांनी वादात सापडलेल्या कायद्याच्या विरोधात घोषणाही दिल्या. महाराष्ट्र सरकारने हा कायदा लागू करू नये, असे निदर्शने करणाऱ्या प्रेक्षकांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details