महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pawan Yadav Journey: तृतीयपंथी समाजात ॲडव्होकेट होण्यासाठीचा पवन यादवचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या!

Pawan Yadav Journey: तृतीयपंथी समाज हा नेहमीच मुख्य प्रवाह धारेपासून वेगळाच असलेला पाहायला मिळाला. मात्र अशा परिस्थितीतही या समाजातील पवन यादव ही युवती उभी राहते आणि थेट ॲडव्होकेट पर्यंतचे शिक्षण पूर्ण करते. आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम सध्या पवन यादव या करत आहेत.

Pawan Yadav Journey:
Pawan Yadav Journey:

By

Published : Dec 1, 2022, 10:55 AM IST

मुंबई:तृतीयपंथी समाज हा नेहमीच मुख्य प्रवाह धारेपासून वेगळाच असलेला पाहायला मिळाला. Pawan Yadav Journey आज आधुनिक युगातही या समाजबाबत अनेक तर्क- वितर्क, शंका- कुशंका उपस्थित केल्या जातात. मात्र अशा परिस्थितीतही या समाजातील पवन यादव ही युवती उभी राहते आणि थेट ॲडव्होकेट पर्यंतचे शिक्षण पूर्ण करते. आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम सध्या पवन यादव या करत आहेत. त्यांचा हा संघर्षमय प्रवास वाचा सविस्तर.

माफक अपेक्षा किन्नर समाजाचे:तृतीयपंथी समाजाला समाजात वावरताना प्रत्येक स्तरावर संघर्ष हा करावाच लागला आहे. आता वाढत्या आधुनिक युगात लोकांची मानसिकता काहीशी बदलत असली तरी, अद्याप तृतीय पंथी समजाचा संघर्ष अजूनही कमी झालेला नाही. आपल्याला किमान माणूस म्हणून माणसासारखी वागणूक समाजात मिळावी, अशी माफक अपेक्षा किन्नर समाजाचे आहे. मात्र अनेकवेळा समाजात त्यांना माणूस म्हणून देखील वागणूक दिली जात नाही. आपल्याला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठीचा याचा मोठा लढा आजपर्यंत किन्नर समाजाने दिला आहे. आज कायद्याने अनेक अधिकार किन्नर समाजातील लोकांना मिळाले आहेत. मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकारयासारखे मूलभूत अधिकारांसाठी देखील वर्षानुवर्ष कायदेशीर आणि सामाजिक लढा या समाजाने दिला आहे.

क्रिमिनल केसेसमध्ये त्यांनी अनेकांना न्याय:मुंबईत राहणारी पवन यादव ही युवती किन्नर समाजाच्या या लढ्याची मूर्तिमंत उदाहरण आहे. पवन यादव ही युती आज पेशाने वकील आहे. गोरेगावच्या दिंडोरी न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून पवन यादव या काम करतात. अनेक महत्त्वाच्या क्रिमिनल केसेसमध्ये त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. मात्र स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठीचा तिचा लढा हा खूप मोठा आहे. अगदी आपल्या कुटुंबातून आपलं अस्तित्व शोधण्यापासून तर शिक्षण घेण्यापर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत वेदनादायी आहे.

सेक्रेटरीचे पदही सोडावं लागलं: गोरेगावच्या यादव कुटुंबात जन्मलेल्या पवन यादवला वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षापर्यंत आपल्यात होणाऱ्या नैसर्गिक बदलाबाबत काहीच कल्पना नव्हती. स्वतः सोबतच त्याचे युद्ध सुरू होतं. त्याच्यात होणाऱ्या बदलांमुळे समाजात त्याच्या बाबत तिरस्काराची भावना जागृत होत होती. त्याच्यासोबतच याचा संपूर्ण फटका त्याच्या कुटुंबीयांनाही बसत होता. पवनचे वडील हे त्यांच्या इमारतीच्या सोसायटीचे सेक्रेटरी होते. मात्र पवनमध्ये होणारे बदल आणि त्यातून होणारा त्याचा तिरस्कार, यामुळे त्यांना आपलं सोसायटीमधील सेक्रेटरीचे पदही सोडावं लागलं. सातत्याने पवनीचा आणि कुटुंबाचा होणारा तिरस्कार पाहता. अनेक महिने पवन यांनी घरातून बाहेर निघणे देखील बंद केलं होतं. एवढेच काय तर एकदा आत्महत्याचा देखील प्रयत्न केला असल्याचं पवन या सांगतात. यातून सावरल्यानंतर त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. काही काळ गुजरातच्या वापी येथे लॅबोरेटरीमध्ये त्यांनी कॉलिटी कंट्रोल भागात कामही केलं. मात्र तिथेही परिस्थिती सारखीच होती.

मात्र पवनचा हा संघर्ष इथेच थांबणारा नव्हता: पवन यांच्यात शिक्षणाचे जिद्द होते. समाजातून सातत्याने होणाऱ्या टीका टोमण्या नंतरही पवनने आपल्या शिक्षणाची जिद्द सोडली नाही. शाळेतूनही अनेकवेळा शिक्षक किंवा विद्यार्थी मित्रांकडून पवन यांना तिरस्काराची वागणूक दिली जात होती. मात्र त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. १० वी फर्स्ट क्लास मधून दहावी उत्तीर्ण केल्यानंतर विज्ञान शाखेत त्यांनी मुंबईत महाविद्यालयात दाखला मिळवला.

असा झाला वकिलीचा प्रवास सुरू: २०१५ साली पवन यादव या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. या दिवसातच पवन यादव हिच्या अगदी जवळच्या नातेवाईकांकडूनच त्यांचा विनयभंग झाला. आपल्यावर झालेल्या अन्याय विरोधात त्यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपण केवळ किन्नर असल्यामुळे आपली तक्रार दाखल करून घेण्यात येत नव्हती. याउलट आपणच आरोपीला फसवत आहोत, अशा प्रकारचे आरोप आपल्यावर झाले. पोलीसही तक्रार दाखल करून घ्यायला तयार नव्हते. जिथे सामान्य महिलेची पुरुषाची तक्रार त्वरित दाखल करून घेतली जाते. तिथेच मी एक किन्नर असल्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाची साधी दखलही कोणी घेत नाही. ही बाब अत्यंत वेदनादायी होती.

महाविद्यालयात प्रवेश दिला जात नव्हता:आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आपल्यालाच उभं राहावं लागेल. यासाठी आपल्याकडे कायद्याचे शिक्षण असणे गरजेचे आहे. याची जाणीव पवन यांना झाली. आणि तेथूनच पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पवन यादव हिने कायद्याचे शिक्षण मुंबईच्या मलाड येथे असलेल्या सी डब्ल्यु सी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथेही प्रवेश घेताना अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या, किन्नर असल्यामुळे त्यांना या महाविद्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. तेथेही संघर्ष केल्यानंतरच पवन यादव हिला प्रवेश मिळवता आला. त्या नंतर २०२१ झाली पवन यादव हीने एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर दिंडोरी न्यायालयात वकिली करत आहे.

सुरू झाली हक्कांची लढाई:किन्नर समाजाला देखील समाजात जगण्याचा अधिकार आहे. त्यांचेही काही मूलभूत हक्क आहेत. या हक्काची लढाई वकील झाल्यानंतर पवन यादव यांनी सुरू केली. अनेकवेळा सार्वजनिक शौचालयात किन्नर यांना घेतलं जात नाही. महिला किंवा पुरुष शौचालयात कुठे जावे, ही मोठी समस्या किन्नर समाजापुढे असल्याने याचा लढा पवन यादव हिने सुरू केला त्यांच्या लढ्याला यश आलं. महाराष्ट्रातील पहिलं किन्नर समाजाचे शौचालय त्यांच्या प्रयत्नामुळे गोरेगाव येथे तयार करण्यात आलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नालसा निकालाप्रमाणे आम्हाला मूलभूत अधिकार कायद्याने मिळाले असले, तरी अजून ते खऱ्या अर्थाने आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे ते अधिकार आम्हाला मिळावेत. यासाठीचा लढा आम्ही सुरू केला असल्याचं पवन यादव ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

तसेच देशात प्रत्येक राज्यांमध्ये किन्नर महामंडळासाठी वेगळी तरतूद केली जाते. किनर महामंडळ अस्तित्वात इतर राज्यांमध्ये असलेले पाहायला मिळतात. मात्र महाराष्ट्रात अद्यापही किन्नर महामंडळाबाबत राज्य सरकारची अनास्था पाहायला मिळते. नक्कीच कागदोपत्री केंद्र महामंडळाबाबतच्या बैठका किंवा त्या संदर्भाचे काही निर्णय घेतले गेलेले आहेत. मात्र ते केवळ कागदोपत्री आहेत. कोणत्याही सरकारने किन्नर समाजाकडे असतील अद्याप तरी पाहिलेलं नाही. त्यामुळे याबाबतचा देखील एक मोठा लढा आम्ही लवकरच उभारणार आहोत, असेही पवन यादव या सांगतात.

समलैंगिक विवाह कायदेशीर करावा:समलैंगिक विवाह किंवा किन्नर समाजामध्ये जी विवाह केले जातात. ते कायदेशीर करण्यात यावेत, अशी ही मागणी पवन यादव या करतात. लग्न करणं हा प्रत्येकाचा खाजगी निर्णय असतो. कोणताही पुरुष किंवा महिला कोणाशी लग्न करायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच किन्नर समाजामध्ये त्याने कोणाशी लग्न करावे, हा देखील त्यांचा खाजगी निर्णय आहे. त्यामुळे याला कायद्याचे स्वरूप लवकरात लवकर प्राप्त झालं पाहिजे, अशी मागणी पवन यादव या करतात. तसेच आपण कायद्याचे शिक्षण घेतले असल्याने याबाबतची जबाबदारी आपल्यावर अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत आपल्या समाजाला अधिक सक्षम आणि जागृत करू, असा निश्चय पवन यादव यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details