मुंबई- महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार हे येत्या 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. त्याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभेच्या जागा आहेत. मुंबईमध्ये कायमच शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व राहिले आहे. शहरी भागात युतीचाच दबदबा मागील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला होता.
हेही वाचा -मराठवाडा विभाग : मतदार राजा कोणासोबत?
2014 ची आकडेवारी -
- भाजप - 15
- शिवसेना - 14
- काँग्रेस - 5
- एमआयएम - 1
- समाजवादी पार्टी - 1
- एकूण - 36
2014 ची राजकीय परिस्थिती -
मुंबई हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबई महानगरपालिकाही शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. तर, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या गडातही 2014 ला आकडेवारीच्या नजरेतून भाजपच सरस राहिला होता. तसेच त्यावेळी मोदी लाटेचा फायदाही भाजपला राजधानीत झाला होता.
हेही वाचा -पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'?