मुंबई - राज्यात शुक्रवारी 593 केंद्रांवर 42 हजार 609 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. आजपर्यंत 4 लाख 32 हजार 186 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आली. तर को-वॅक्सीन ही लस आज 276 तर आजपर्यंत 4 हजार 382 लाभार्थ्यांना देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात आज 42 हजार 609, तर आतापर्यंत 4 लाख 32 हजार लसीकरण
राज्यात शुक्रवारी 593 केंद्रांवर 71 हजार 456 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 42 हजार 609 म्हणजेच 60 टक्के आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात शुक्रवारी 593 केंद्रांवर 71 हजार 456 लसिकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 42 हजार 609 म्हणजेच 60 टक्के आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. त्यात 33 हजार 880 आरोग्य कर्मचारी तर 8729 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आजपर्यत 4 लाख 32 हजार 186 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण जालना जिल्ह्यात 102 टक्के झाले असून त्या पाठोपाठ अकोला 97 तर उस्मानाबाद 92 टक्के इतके झाले आहे. सर्वात कमी लसीकरण लातूर जिल्ह्यात 30 टक्के तर बीड जिल्ह्यात 37 टक्के झाले आहे.
को-वॅक्सीन लस -
राज्यात सहा ठिकाणी 7 केंद्रांवर को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. या लसीसाठी आज 650 चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 276 म्हणजेच 42 टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत 4 हजार 382 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 126 जणांना, औरंगाबाद 49, मुंबई 41, पुणे येथे 40, नागपूर 36, सोलापूर 09 असे 301 जणांना ही लस देण्यात आली.
जिल्हानिहाय आकडेवारी -
- मुंबई उपनगर 45288
- ठाणे 40422
- पुणे 38180
- मुंबई 22511
- नागपूर 20712
- नाशिक 18993
- अहमदनगर 17500
- सातारा 15537
- सोलापूर 15398
- कोल्हापूर 12728
- औरंगाबाद 12721
- सांगली 11495
- वर्धा 10906
- पालघर 10258
- चंद्रपूर 10019
- अमरावती 9846
- जळगाव 9254
- लातूर 8705
- नांदेड 7856
- बीड 7302
- बुलढाणा 7287
- धुळे 7170
- जालना 7100
- यवतमाळ 6904
- भंडारा 6254
- गडचिरोली 6038
- रत्नागिरी 5811
- रायगड 5749
- नंदुरबार 5614
- गोंदिया 5148
- उस्मानाबाद 4970
- अकोला 4372
- वाशिम 3014
- सिंधुदुर्ग 3692
- हिंगोली 3350
- परभणी 3283
एकूण - 4, 32,186