मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. रांगेसाठी प्रभादेवी पासून शिवाजीपार्क पर्यंत शेड बांधण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी शिवाजी पार्कमध्ये येण्यास सुरूवात
डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात. यासाठी पालिकेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा-'अनोखा गुगलमॅन'; त्याच्या "जिद्दी"समोर दोन्ही डोळ्यांचे अपंगत्वही हरले....
डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात. यासाठी पालिकेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजीपार्क मैदानात पालिकेच्या वतीने भव्य मंडप उभारून निवासाची व्यवस्था केली आहे. अनुयायांना रांगेत दर्शन घेता यावे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे अडचण भासू नये याकरता पालिका व विद्युत परिवहन मंडळाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. तर चैत्यभूमी येथील स्तंभ उजळून निघाला आहे.
चैत्यभूमी परिसरातील दुकानेही सजली असून बाबासाहेब यांचे फोटो फ्रेम, विविध पुस्तके, निळे झेंडे, कॅलेंडर, बिल्ले, टोप्या, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येतात. यावर्षी 20 लाखाहून जास्त अनुयायी येण्याची शक्यता आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती तर्फे पालिका प्रशासनाबरोबर काम करत आहोत, असे समितीचे शिरीष चिखलीकर यांनी सांगितले.