महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी परीक्षेत सायनचे ३१ विद्यार्थी चमकले

एनएमएमएस परीक्षेत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने डी. एस. हायस्कूलने मुंबई विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते त्यात डी. एस. हायस्कूलचे ३१ विद्यार्थी आहेत

By

Published : Mar 23, 2019, 12:12 PM IST

सायनच्या ३१ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

मुंबई- भारत सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे गळती प्रमाण रोखून दुर्बल घटकांतील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप (एनएमएमएस) या परिक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेत सायन येथील डी. एस. हायस्कूलचे ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पुढील ४ वर्षे शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

एनएमएमएस परीक्षेत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने डी. एस. हायस्कूलने मुंबई विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते त्यात डी. एस. हायस्कूलचे ३१ विद्यार्थी आहेत. भारत सरकारतर्फे एनएमएमएस ही शिष्यवृत्ती योजना २००७ पासून राबवली जात आहे. गेल्या वर्षी डी. एस. हायस्कूलचे ७३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. तर यावर्षी ३१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावी या ४ वर्षांत प्रत्येकवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, असे डी. एस. हायस्कूलचे मुख्यध्यापक अंकुश महाडिक म्हणाले. हे सर्व विद्यार्थी धारावी, अंटाफहिल अशा परिसरातील गरीब कष्टकरी समाजातील असून शिष्यवृत्तीमुळे पालकांचा शालेय शुल्काचा भार हलका होणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details