महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवनिर्वाचित आमदारांशी भाजप करणार चर्चा, अनेक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता

निवडणूक झाल्यापासून भाजपने विधिमंडळ नेत्याची निवड केली आहे. आमदारांची मते जाणून घेतली नाहीत. तसेच काही आमदार नव्याने निवडून आले आहेत . त्या आमदारांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले . यामध्ये मध्यावधीचा काहीही संबंध नाही. भाजप आपल्या नियोजित बैठकांवर भर देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

By

Published : Nov 14, 2019, 5:45 PM IST

सुजितसिंह ठाकूर, नेते भाजप

मुंबई - मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजची युती तुटली. त्या पार्श्वभूमिवर भाजपमध्ये आता सद्य राजकीय स्थितीवर मंथन सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबई येथील भाजप कार्यालयात आज (गुरुवारी) बोलवण्यात आली आहे. काही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती सुजितसिंह ठाकूर यांनी दिली

हेही वाचा -प्रहारच्या शेतकरी मोर्चावर झालेल्या दडपशाहीचा जाहीर निषेध - अजित नवले

महायुतीला जनादेश मिळूनही सरकार स्थापन करता आले नाही. सहयोगी शिवसेनेची अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी पूर्ण न केल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला असून, या महत्वाच्या मुद्यावर आमदारांची मत जाणून घेतली जाणार आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश रावल यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक निवडणूक होतील असे भाकीत केले होते. याला अनुसरून भाजप मध्यावधी निवडणुकांची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा आहे .

हेही वाचा -ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजभवनावर 'प्रहार', बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

मात्र, निवडणूक झाल्यापासून भाजपने विधिमंडळ नेत्याची निवड केली आहे. आमदारांची मते जाणून घेतली नाहीत . तसेच काही आमदार नव्याने निवडून आले आहेत . त्या आमदारांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले . यामध्ये मध्यावधीचा काहीही संबंध नाही. भाजप आपल्या नियोजित बैठकांवर भर देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . पक्षातल्या स्थानिक पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्षांना या बैठकीत बोलावले असून, पुढील तीन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली .

ABOUT THE AUTHOR

...view details