मुंबई : कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 806 रुग्ण आढळून आले असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 999 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह, डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 58 हजार 137 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 996 सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 67 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 806 रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. या 64 मृत्यूंपैकी 54 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 44 पुरुष आणि 20 महिला रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये 5 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 40 जणांचे वय 60 वर्षावर तर 19 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 58 हजार 137 वर पोहोचला आहे. तर, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 58 हजार 137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 996 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.