महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन अमली पदार्थ तस्करांना एनसीबीने केली अटक; मर्सिडीजमधून करायचे विक्री

एनसीबीने मुंबईमध्ये सध्या धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी छापे टाकून काही अमली पदार्थ तस्करांना ताब्यात घेतले आहे.

Drug smugglers
अमली पदार्थ तस्कर

By

Published : Feb 8, 2021, 12:06 PM IST

मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने केलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उर्फ इब्राहिम कासकर व आसिफ राजकोटवाला या दोन अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या आरोपींकडून एक मर्सिडीज कार सुद्धा हस्तगत केली आहे.

आरिफ भुजवालाने दिली माहिती -

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आरिफ भुजवाला व चिंकू पठाण या दोन अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आलेली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालणारे हे दोन हस्तक म्हणून ओळखले जात होते. आरिफ भुजवाला याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये एनसीबीने छापेमारी सुरू केली आहे. या दरम्यानच मुजावर याचे नाव समोर आले होते.

मर्सिडीज कारमध्ये बसून करायचा अमली पदार्थांचे वितरण -

अटक करण्यात आलेला आरोपी मुजावर उर्फ इब्राहीम कासकर हा मुंबई शहरातील परिसरामध्ये अमली पदार्थ तस्कर म्हणून परिचित आहे. तो महागड्या मर्सिडीज कारमध्ये बसून अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुजावर याला अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आसिफ राजकोटवाला या आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर डोंगरी परिसरातून एनसीबीने त्याला अटक केली. त्याच्याकडून चरस हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी गेल्या वर्षभरापासून एकत्र काम करत होते. दक्षिण मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये अमली पदार्थांचे वितरण करत होते. मुजावर उर्फ इब्राहिम कासकर याच्यावर या अगोदरही पोलिसांवर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details