मुंबई - मुंबईमधील कोरोना विषाणूने पुन्हा इमारतींमध्ये प्रवेश केला आहे. तीनपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या इमारती पूर्ण सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात 'डी' विभागातील मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीपासून झाली आहे. या इमारतीत गेल्या दीड महिन्यात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. याच इमारतीत नव्याने पुन्हा ५ रुग्ण आढळून आल्याने ही इमारत सील करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.
मुंबई सेंट्रल येथील 'ही' सोसायटी ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट; दीड महिन्यात ५५ रुग्ण, इमारत सील
मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत आज ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या दीड महिन्यात या इमारतीत कोरोनाचे ५५ हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दुष्टीने इमारत सील करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. मुंबईतील अंधेरी ते दहिसर, भांडूप, मुलुंड, ग्रँटरोड या विभागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतील हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. या विभागात विशेष करून इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झाला आहे. या इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याने पालिकेने कोरोनाचे तीन रुग्णाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या ‘डी’ विभागात मुंबई सेंट्रल, ग्रॅटरोड, मलबार हिल आदी परिसर येतात. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत आज ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या दीड महिन्यात या इमारतीत कोरोनाचे ५५ हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सुरेक्षेच्या दुष्टीने इमारत सील करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. डी वॉर्डात आतापर्यंत ३ हजार ९०३ रुग्ण आढळले असून यापैकी २ हजार ८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, १६२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.