मुंबई - गेल्या पाच वर्षात समाजाला आणि नागरिकांना आवश्यक असलेली कामे केली आहेत. यामुळे या निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त मते मिळवून सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू, असा विश्वास शिवडी मतदारसंघाचे आमदार व शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. शिवडी मतदारसंघातील बेस्ट वसाहतीमध्ये प्रचाराला आले असता ते 'ई टीव्ही भारत'शी बोलत होते.
शिवडी मतदारसंघामधील कामांसाठी गेल्या पाच वर्षात 133 कोटी रुपयांचा फंड पास करून कामे करून घेण्यात आली आहेत. काही कामे बाकी आहेत काही कामे करायची आहेत. त्यात मुलांसाठी एक स्केटिंग ग्राउंड उभारले जाणार आहे, निवडणुकीच्यानंतर पालिकेच्या गार्डनमध्ये त्याचे उद्घाटन होईल. जलतरण तलाव, शाळेची निर्मिती, कबड्डीसाठी इनडोअर स्टेडियम बनवण्याचा मानस असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा -ठाकरेंच्या 'राज'सभांच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होणार का?
बेस्ट कामगार आणि प्रशासन यामध्ये वाद होता. प्रशासन आणि युनियन आपली मनमानी करत होते. मात्र, कामगारांच्या रोजच्या गरजा शाळा, अॅडमिशन, रुग्णालयात रक्त पाहिजे, नोकरी अशा अनेक समस्या आहेत, पाण्याची समस्या होती त्यासाठी वेगळी लाईन टाकण्यात आली. बेस्ट कामगारांच्या वसाहती वाईट अवस्थेत आहेत. त्याचा पाठपुरावा करून महापालिकेकडून 10 कोटी मंजूर करून घेतले आहेत. यामुळे बेस्ट कामगार माझ्या आणि शिवसेनेच्या मागे असल्याचा दावा चौधरी यांनी केला.
हेही वाचा - आमदार अजय चौधरींची मुलाखत
माझ्या प्रचारासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. आम्ही भाड्याने माणसे आणत नाहीत. विरोधकांना भाड्याने माणसे आणावी लागत आहेत. आम्ही माणूस कसा जगेल याचा विचार करत असतो. हे अलोट प्रेम मला निवडणूक जिंकून देईल. शिवसैनिक आणि मतदारांचा उत्साह पाहून एक लाखापेक्षा जास्त मते आम्ही या मतदारसंघातून मिळवून विरोधातील सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू, असे चौधरी म्हणाले.